औंढा नागनाथ: वाळूची चोरटी वाहतूक पोलिसांनी वाळकी जवळ पाठलाग करून दोन टिप्पर पकडले;३० लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त चौघांवर गुन्हादाखल
औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर वाळकी तसेच बोरजा फाट्याजवळ अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास राठोड, किशोर पारीसकर, माधव सूर्यवंशी यांनी पाठलाग करून दिनांक ९ नोव्हेंबर रविवार रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास पकडले यामध्ये टिपर क्रमांक बीआर १० जीबी ३४६१, दुसरी टिप्पर क्रमांक एमएच २२ एएन ३०६६ असे दोन टिप्पर वाहन वाळूसह ज्यांची किंमत ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले