कोपरगाव: शहरातील गोदाकाठ व निवारा येथील स्वामी समर्थ केंद्रातील दत्त जयंती सांगता सोहळ्यास आ.काळे यांची भेट
श्री दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आज ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र, गोदाकाठ व श्री स्वामी समर्थ केंद्र, निवारा येथे पारायण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिवस चाललेल्या या पारायणाचे आज विधिवत समाप्ती कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.समाप्ती सोहळ्याला आमदार आशुतोष काळे तसेच ओमप्रकाश दादाप्पा कोयटे यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ व श्री दत्तांचे मनोभावे दर्शन घेतले.