अमरावती: आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज ११ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता सुकळी कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनीची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी डेपोतील स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा व गतीमानतेचे निर्देश दिले. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव.....