खामगाव: एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे घडली
एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. खामगाव तालुक्यातील बोरी अडगांव येथील गणेश काशीराम ढाकरे वय 31 वर्षे यांनी बोरी अडगांव शेत शिवार येथे विषारी औषध प्राशन केले होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला.