शिरपूर: शिरपूर-वरवाडे नगरपालिका निवडणूक,माघारीअंती लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट,नगराध्यक्ष पदासाठी भाजपा विरुद्ध शिवसेना
Shirpur, Dhule | Nov 21, 2025 शिरपूर–वरवाडे नगरपालिका निवडणुकीत 21 नोव्हेंबर 2025 रोजी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आता भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट द्वंद्व होणार आहे. 32 सदस्यपदांपैकी 16 प्रभागांतील 23 जागांवर सरळ लढत, तर 9 जागांवर तिरंगी-चौरंगी लढत होणार आहे. पुढील पाच वर्षांचा विकास ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे आता लक्ष लागले असून मतदान 2 डिसेंबरला होणार आहे.