नागपूर शहर: मरियम नगर येथे त्या कुख्यात आरोपीने मागितली हात जोडून माफी ; व्हिडिओ व्हायरल
9 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सीताबर्डी हद्दीत येणाऱ्या मरियम नगर येथे कुख्यात बदमाश अशपाक खान याने नागरिकांना मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान सीताबर्डी पोलिसांनी कार्यवाही करत आरोपिण्यांच्या ठिकाणी गोंधळ घातला होता त्या ठिकाणी नागरिकांना त्याला हात जोडून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा आरोपी कारागृहातून नुकताच बाहेर येऊन त्याने गोंधळ घातला होता.