हिंगणघाट: आमदार कुणावार यांच्या विकास कामाच्या पाठपुराव्यामुळे डोक्यावरचे केस कमी झाले म्हणत मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरून कौतुक
हिंगणघाट नगरपालिकेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रचारात सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात आले होते.यावेळी व्यासपीठावरून त्यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्यात असलेल्या विकासाच्या तळमळीचे मनसोक्त तोंडभरून कौतुक करीत म्हणाले की आमदार समिरभाऊ कुणावार हे असे व्यक्ती आहे ते त्यांना पाहिले ते मिळवून घेण्यात पाठपुरावा करतात त्यांच्या पाठपुराव्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस कमी झाले आहे.