खामगाव: आठवडी बाजार येथील बेपत्ता इसमाचा रायगड कॉलनी जवळील नाल्यात मृत अवस्थेत मृतदेह मिळून आला
आठवडी बाजार येथून बेपत्ता झालेल्या इसमाचा मृत अवस्थेत मृतदेह मिळून आल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान रायगड कॉलनी जवळ एका नाल्यात उघडकीस आहे. आठवडी बाजार येथील विजयकुमार धनराज सराफ वय ७५ वर्ष हे घरून बेपत्ता झालेले होते.त्याचा मृतदेह रायगड कॉलनी जवळील एका नाल्यात मृत अवस्थेत मृतदेह नागरिकांना दिसून आला यावेळी नागरिकांनी शिवाजी नगर पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खामगाव येथे सामान्य रुग्णालयात पाठविला.