केज: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, धनंजय देशमुख
Kaij, Beed | Nov 29, 2025 मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत या नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत सरपंचांना न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया बंधु धनंजय देशमुख यांनी दिली आहे.