रामटेक: भव्य शोभायात्रेने दुमदुमली रामटेक नगरी ; रामाळेश्वर वॉर्डाच्या 'द्रौपदी वस्त्रहरण' चलचित्ररथाला मिळाला प्रथम पुरस्कार
Ramtek, Nagpur | Nov 5, 2025 वैकुंठ चतुर्दशीच्या पावन पर्वावर मंगळवार दि. 4 नोव्हेंबरला सायं. 6 वाजता पासून अठराभूजा गणेश मंदिर रामटेक येथे पूजा अर्चनानंतर रामटेक शहरात काढल्या जाणाऱ्या पारंपरिक शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचे समापन रात्री 2 वाजताच्या दरम्यान झाले. यावेळी अभिनेता गजेंद्र चव्हान,अभिनेता व्यंकटेश कुमार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्याम कुमार बर्वे, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव डी मल्लिकार्जुन रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.