काटोल: लिंगा येथे तलाठी कार्यालयाच्या बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न
Katol, Nagpur | Nov 9, 2025 रिधोरा जिल्हा परिषद गटातील लिंगा येथे तलाठी कार्यालयाच्या बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याला स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार ठाकूर यांनी नागरिकांशी संवाद साधत गावाच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली.