अमरावती: टीईटी विरोधात शिक्षकांचा अमरावतीत मुक मोर्चा
शिक्षक पात्रता चाचणी सक्ती रद्द करण्याची मागणी
शिक्षक पात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य केली आहे. मात्र याला राज्यभरातील शिक्षकांचा तीव्र विरोध असून या सक्तीविरोधात अमरावती मध्ये शिक्षकांनी भव्य मूक मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात शेकडो शिक्षकांनी सहभागी होत टीईटी सक्ती रद्द करा, अशी जोरदार मागणी केली आहे.