महाड शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व उद्योजक राजेश पांडुरंग गायकवाड (राजू शेठ) यांनी कुटुंबीयांसह आणि प्रभाग ८ मधील शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नामदार भरत शेठ गोगावले आणि युवा नेते विकास गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.