सातारा: छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासाठी तिरंगा विकास प्रतिष्ठानची मागणी
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा – राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदा शेडगे यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, “स्मारक आणि संग्रहालय उभारणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहोत. शिवरायांचे जीवनकार्य आणि इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हे आमचे उद्दिष्ट आहे.तसेच, पशुसंवर्धन विभागाच्या प्राणी आरक्षण असलेल्या राखीव जागेवर इतर कोणतेही आरक्षण न टाकण्याची मागणीही त्यांनी केली.