कोरेगाव: रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत समाजमाध्यमांवर संयम बाळगा; सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे-पाटील यांचे आवाहन
रहिमतपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे-पाटील यांनी दिली. शुक्रवारी दुपारी तीन वाजता रहिमतपूर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणूक काळात समाज माध्यमांवर कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये, अफवा पसरवू नये किंवा कोणाच्याही चारित्र्यावर टीका करणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट टाकू नयेत.