मांडवगणमध्ये सिध्देश्वर महाराज यात्रेदरम्यान दोन युवकांवर प्राणघातक हल्ला : आरोपी चव्हाण भावंडांना अटक मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील सिध्देश्वर महाराज यात्रेदरम्यान मध्यरात्री दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने गावात खळबळ उडाली. या हल्ल्यात योगेश नंदु रायकर (वय 27) गंभीर जखमी झाला असूनत्यांची प्रकृतीत चिंताजनक आहे. तर त्याचा मित्र परमेश्वर आनंदकर यालाही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रात्री 12.15 वा. स्मशानभूमी जवळील शोभेची दारू कार्यक्रमादरम्यान घडली.