उदगीर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उदगीरच्या सभेतून आरोग्य मंत्र्यांना फोन,रुग्णालयातील सुविधा उपलब्ध करुन द्या
Udgir, Latur | Nov 29, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा सुरू असून उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष एकमेका विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे,२९ नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार पंचाक्षरी यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आले असता उदगीर येथील सामान्य रुग्णालयाचा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उपस्थित करण्यात आला, तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य मंत्र्यांना फोन लावला