हवेली: बीटी कवडे रस्त्यावर अल्पवयीन आरोपींकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड
Haveli, Pune | Nov 4, 2025 बी टी कवडे रस्त्यावर अल्पवयीन टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड करण्यात आली. बालसुधारगृहात आलेल्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी सदर अल्पवयीन आरोपींनी हे कृत्य केल्याची पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.