हवेली: चिखलीतून तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
Haveli, Pune | Nov 28, 2025 तडीपार असतानाही हद्दीत आलेल्या गुंडाला पिस्तुलासह चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. रोहित उर्फ बाबू प्रकाश हिरे (रा. पाटीलनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.