जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात शुक्रवार, ५ डिसेंबर सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका अत्यंत हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत इलेक्ट्रिक शॉक लागून एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेली ९ वर्षांची भाची गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.