नरखेड: नगरपरिषद मोवाड येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मालकी हक्काचे पट्टे वाटप
आज नगर परिषद मोवाड व तहसील कार्यालय नरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने “सर्वासाठी घरे” या योजनेअंतर्गत नगर परिषद मोवाड येथे भव्य पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते पात्र व गरजू नागरिकांना घरपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले.