भद्रावती नगरपरीषदेची सार्वत्रिक निवडणूक २डिसेंबरला होत असुन ३ डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय यंत्रनेची तयारी पुर्ण झाली असुन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणुक पुर्वतयारीचा आढावा घेत मतमोजणी केद्र असलेल्या शासकीय औदयोगिक प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शहरातील विवीध मतदान केंद्रानाही भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सुचना दिल्या.