आज मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर-: छत्रपती संभाजीनगर येथील गोसेवा आश्रम, श्रीक्षेत्र बजाजनगर (MIDC वाळूज) येथे आजपासून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या २२ व्या नारळी सप्ताहाला आणि ३६ व्या पुण्यतिथी सोहळ्याला प्रारंभ झाला. श्री ह.भ.प. कीर्तनकेसरी बालगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.