छत्रपती शिवाजीनगर भागातील फाशीच्या डोंगरा जवळ आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अरविंद पांडे नामक व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याची घटना समोर आली आहे.सदर व्यक्तीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.याबद्दल अधिक माहिती अशी की, अरविंद पांडे ही व्यक्ती 28 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता झाला होता. तो सातपूरच्या स्वार बाबा नगर परिसरातील रहिवासी असून शिवाजीनगरला आत्याच्या घरी गेला असल्याचे समजते आहे.