जुन्नर: मंचर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Junnar, Pune | Oct 29, 2025 माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिराला मंचर शहरातील नागरिकांकडून दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सौ. मोनिकाताई सुनील बाणखेले आणि सुनील दामोदर बाणखेले यांच्या माध्यमातून या शिबिर व मोफत चष्मा वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.