सिन्नर: सिन्नर आगारात बस दुर्घटना, एकचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
Sinnar, Nashik | Nov 19, 2025 सिन्नर आगारातून देवपूरकडे नेण्यासाठी आणलेली एसटी बस फलाटावर लावताना अचानक ब्रेक फेल झाल्याने थेट फलाटावर चढली. यामुळे उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दापूर येथील ९ वर्षीय आदर्श बोऱ्हाडे याचा मृत्यू झाला, तर त्याची आई गौरी बोऱ्हाडे, विठाबाई भालेराव व ज्ञानेश्वर भालेराव गंभीर जखमी झाले.