शेगाव: माटरगाव शिवार येथे विष प्राशन करून शेतकऱ्याचा मृत्यू
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. माटरगाव येथील राजेश प्रल्हाद वाघ (५०) यांनी माटरगाव शिवार येथील शेतात विष पाषाण केले त्यांचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांच्या वडिलांच्या नावे घेतलेल्या पीककर्जाची परतफेड न झाल्याने मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.