राहुरी शहरातील नगरपालिका निवडणुक प्रचार अतिशय शांततेत चाललेला आहे. माञ विरोधकांकडून गालबोट लावण्याचा प्रकार केला जात आहे. माजी मंत्री प्राजक्ता पुरे यांनी प्रचार फलकाला काळे फासल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत जर आजच अशी परिस्थिती असेल तर नगरपालिका ताब्यात आल्यानंतर हे लोक काय करतील ? असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.