परळी: तालुक्यातील आचार्य टाकळी येथे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला भीषण आग लागली असून, लाखोंची नुकसान झाले
Parli, Beed | Nov 29, 2025 परळी तालुक्यातील आचार्य टाकळी परिसरात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आचारी टाकळी शिवारात अज्ञात कारणामुळे ही आग लागली असून, वाऱ्याच्या वेगामुळे काही क्षणांतच आग प्रचंड भडकली. शेतात उभे असलेले ऊसाचे पीक आगीत पूर्णपणे भस्मसात झाले.या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, अनेक एकरांवरील ऊस जळून खाक झाला आहे. ऊस हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याने या दुर्घट