हिंगणघाट: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून निवडणूक दरम्यान घेण्यात येणाऱ्या संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आढावा
हिंगणघाट शहरात २ डिसेंबर होऊन हातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर मतदान शांतते व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून २ वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायर यांनी तहसीलदार कार्यालय परीसरात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला असून मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व शांततेत पार पडण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुचना केल्या आहेत