ठाणे: कोपरी येथील इमारतीतील लिफ्ट कोसळली
Thane, Thane | Nov 8, 2025 कोपरी विभागातील "सिद्धार्थ नगर" परिसरातील "A4 अष्टविनायक" सोसायटीत लिफ्ट कोसळल्याची घटना आज घडली आहे. अपघातानंतर एक गर्भवती महिला व तीन लहान मुलांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास स्थानिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.