रामटेक: पोहणे शिकताना जयपालेश्वर तलावात बुडून भाचीचा मृत्यू, वाचवायला गेलेला मामा ही बुडाला
Ramtek, Nagpur | Nov 5, 2025 रामटेक जवळील जयपाळेश्वर तलावात पोहणे शिकत असताना आधारासाठी जवळ असलेली रबर ट्यूब अचानक निघाल्याने घाबरलेली 13 वर्षीय हर्षिता पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहून मामा अजय याने तिला पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेल्या हर्षिताने मामालाच घट्ट पकडून ठेवल्याने भाची हर्षितासह मामा अजय ही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना बुध. दि. 5 नोव्हेंबरला स. 8 वाजताच्या दरम्यान जयपालेश्वर तलावात घडली. मृतक चे नाव हर्षिता विनोद माकडे, रामटेक व मामा अजय लोहबरे 32 वर्ष रा. खात असे आहे.