सेलू: महाबळा ग्रामपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन
Seloo, Wardha | Nov 26, 2025 तालुक्यातील ग्रामपंचायत महाबळा येथे आज ता. २६ नोव्हेंबर बुधवारी सकाळी ११ वाजता संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद ढुमणे होते. या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारताच्या संविधानातील मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.