पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात , सावळघाटात दोनशे फुट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक
Peint, Nashik | Nov 27, 2025 नाशिकहून गुजरातकडे जाणारा एक मालवाहू ट्रक सावळघाटा च्या एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक कठडे तोडून जवळपास 200 फुट दरीत कोसळला. यामध्ये चालक अडकून पडल्याने रस्त्यावरील ये जा करणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. सायंकाळ पर्यंत क्रेनच्या साह्याने मदत कार्य सुरू होते.