हवेली: चिंचवड येथे रिक्षाचालकास दांडक्याने मारहाण
Haveli, Pune | Nov 8, 2025 रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून एकाने रिक्षाचालकास लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. ४) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.विशाल सुरेश शिंदे (वय २५, रा. दत्त कॉलनी, मोरे वस्ती, साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.