करवीर: अंबाबाई देवीच्या गर्भगृहाची स्वच्छता सुरू ; आज दिवसभर अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन राहणार बंद
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज अंबाबाई देवीच्या गर्भगृहाच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन त्यामुळे बंद राहणार आहे. तोपर्यंत उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे.