शिरोळ: कुंभोज गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दैना, खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीवघेणा प्रवास
कुंभोज गावात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सध्या ग्रामस्थांच्या जीवघेण्या अडचणीचे कारण ठरत असून, गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतूक व्यवस्थेला झळ बसली आहे. गावातील अंतर्गत रस्ते व शेतपथ केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले असून,त्यावर कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.ट्रक, जेसीबी आणि इतर यंत्रांची अवजड वर्दळ यामुळे रस्ते उखडून गेले असून,पावसाळ्यामुळे चिखलाचे आहे.