कुही: पचखेडी येथे अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Nov 23, 2025 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी येथे गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलीसांनी पाहणी केली असता आरोपी दारू विक्री करताना आढळून आला. त्यावरून आरोपीस ताब्यात घेऊन वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की वेलतुर पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे पचखेडी येथे अवैधरित्या दारू विक्री वर धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन 12 निप देशी दारु जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.