हिंगणघाट: त्या खुर्सापार जंगलातील ५ वाघांना तात्काळ जेरबंद करा:आमदार समिरभाऊ कुणावार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गिरड खुर्सापार परीसरात गेल्या ११ महिन्यापासुन वास्तव्यात असलेल्या ५ वाघामुळे शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या पाचही वाघांना तातडीने जेरबंद करण्याचा संबंधितांना आदेश करावा अशी मागणी आमदार समिर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.