वारजे परिसरातील गणपती माता येथे सोमवारी सकाळी मिनी बसने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चुराडा झाला आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे नेम