उदगीर: उदगीर नगरपालिका निवडणुक मतदान केंद्रांवरील कामकाज ऑनलाइन दिसणार, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे
Udgir, Latur | Dec 1, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूक २०२५ ची तयारी पूर्ण झाली असून,२ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात होईल, तीन जागेची निवडणूक पुढे ढकलली असून २ डिसेंबर रोजी ३८ जागेसाठी मतदान पार पडणार आहे,उदगीर नगरपालिका निवडणूक मतदान केंद्रावरील कामकाज पूर्णपणे ऑनलाइन दिसणार असून तशी सिस्टीम चालू करण्यात आली आहे मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे,असे आवाहन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे