अंबरनाथ: बारवी डॅम परिसरात आढळला साडेआठ फूट लांबीचा अजगर जातीचा साप, थरारक व्हिडिओ आला समोर
अंबरनाथ,बदलापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळत आहेत. कारण आता सिमेंटची जंगले वाढल्यामुळे वन्य प्राण्यांना राहण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यामुळे वन्य प्राणी आता मानवी वस्तीत शिरताना पाहायला मिळत आहेत. बारवी डॅम परिसरातील एका फार्म हाऊस वर देखील एक अजगर जातीचा साप आढळून आला. त्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने सापाला रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडले.