तालुक्यातील बिजोणी येथील लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या गावातील पांदण रस्त्याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते. यावेळी गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या निणादात प्रमुख पाहुण्यांची गावातून मिरवणूक काढून आपला आनंद व्यक्त केला.