हवेली: वाडेबोल्हाई येथील शिंदे वस्ती येथे घराच्या टेरेस वरून प्रवेश करून डीव्हीआर, कोर्ट केसची कागदपत्रे नेली चोरून नेली
Haveli, Pune | Nov 27, 2025 बंद घराच्या टेरेसवरील दरवाजा वाटे घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले जमिनीच्या शिवाजीनगर कोर्टातील दाव्या संदभार्तील कागदपत्रे, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, डोंगल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वाडेबोल्हाई येथील गावडेवाडी रोड शिंदे वस्ती येथे घडली.याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.