शेवगाव: शेवगावकरांसाठी धावून आला खाकी वर्दीतील देवमाणूस
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावकरांनी खाकी वर्दीच्या आतली माणुसकी अनुभवली आहे. सध्या सर्वत्र आणि सर्वदूर महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यातच शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील आव्हाड वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेले असताना त्या ठिकाणी सहा ते सात महिला आणि पुरुष अडकले होते. त्यात वयोवृद्ध असलेल्या महादेव अव्हाड हे ८५ वर्षीय व्यक्ती देखील अडकले होते.