पुणे-नाशिक महामार्गावर गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंचर येथील काही तरुणांनी खेड घाटात एसटी बसच्या मार्गात थार गाडी आडवी लावली आणि बसमध्ये घुसून चालक व कंडक्टरला मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.