सातारा: उद्यापासून नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात; सातारा नगरपालिकेत तयारी पूर्ण – मुख्याधिकारी विनोद जळक
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होत असून उद्या सोमवारपासून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. नगरपालिकेच्या कार्यालयात अर्ज स्वीकृतीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना आवश्यक ती मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.