रामटेक: किरणापुर येथे श्री चक्रपाणी प्रभू महाराज जन्मोत्सव व राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता अभियानाचे समापन
Ramtek, Nagpur | Nov 10, 2025 ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते आणि महानुभाव पंथाचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा जपत मागील 12 वर्षापासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियानाचा भव्यसमारोह रामटेक तालुक्यातील किरणापुर (काचुरवाही) येथे रवि. दि. 9 व सोम.दहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी केले.अध्यक्षता अ.भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्रीकांरेंजकर बाबा नी केली.