राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील महायुतीची सत्ता यायला पाहिजे. कारण विरोधी गटाचे राज्यात सरकार नाही. त्यामुळे ते राहुरी शहराचा विकास करू शकत नाही.आमचेच सरकार राज्यात आणि केंद्रात त्यामुळे आम्हीच विकास करू शकतो. असे वक्तव्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. आज बुधवारी दुपारी राहुरी शहरांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना माध्यमांशी संवाद साधताना ना.विखे बोलत होते.