कुही: खैरलांजी शिवारात अवैधरित्या कृषी निविष्ठांची विक्री,7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | Nov 7, 2025 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने जैविक खते, कीटकनाशके अवैधरित्या विक्री करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7 लाख 20 हजार 342 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. विनोद संपत निंबारते वय 36 राहणार मुजबी जिल्हा भंडारा असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.